धाराशिव जिल्हयाची संक्षिप्त माहिती
मराठवाडयातील महत्वाचा जिल्हा म्हणून धाराशिव जिल्हयाची ओळख असून या जिल्हयात एकूण 08 तालुके आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार धाराशिव जिल्हयाची एकूण लोकसंख्या 16,57,576 असून अनुसूचित जातीची लोकसंख्या 2,65,184 एवढी असून एकूण लोकसंख्येच्या 16 % इतके प्रमाण आहे.
ऐतिहासिक महत्त्व
• धाराशिव जिल्हा पुर्वीच्या हैद्राबाद राज्यातील मराठवाडा संबोधल्या जाणा-या मराठी भाषिक जिल्हयापैकी एक आहे.
• महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर येथील प्राचिन मंदिरामुळे या जिल्हयास धार्मिक संस्कृतीच्या व भक्तीचा पवित्र वारसा लाभलेला आहे.
• बालाघाट पर्वत रांगेमध्ये धाराशिव शहरापासून 07 किमी अंतरावर प्राचिन धाराशिव लेणी आहेत.
• परंडा येथे कल्याणीच्या चालुक्य काळातील किल्ला आहे.
• नळदुर्ग येथे भुईकोट किल्ला असून किल्यामधील नर-मादी धबधबा प्रसिध्द आहे.
• कुंथलगिरी, ता. भूम येथे दिगंबर जैन सिध्दक्षेत्र व मंदिर आहे.
• तेर या गावी रोमन साम्राज्यातील प्राचिन संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही उपलब्ध आहेत. या ठिकाणी प्रसिध्द लामतूरे वस्तूसंग्रहालय आहे.
• धाराशिव येथे धारासुर मर्दिनीचे मोठे मंदिर आहे, तसेच हजरत ख्वाजा शमशोदीन गाजी प्रसिध्द दर्गा आहे.