मुला मुलींसाठी शासकीय वसतिगृह

• शासन निर्णय :
1) शासन निर्णय समाज कल्याण सांस्कृतिक कार्य क्रीडा व पर्यटन विभाग क्रमांक बी. सी. एच. १०८२ / ९०३८५ (३८) बी.सी .डब्ल्यू. -४ दिनांक :- १६ मे १९८४
2) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक : बी.सी.एच.२०१० / प्र. क्र. -४३० मावक - ४ दिनांक :- २६ जुलै २०११
3) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक : खाबाप्र २०१२ प्र. क्र. ११६ / शिक्षण - २, दिनांक:- २ जुलै २०१२

• उद्दिष्ट:
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. सदरची योजना सन १९२२ पासून कार्यान्वित आहे. सध्या महाराष्ट्र विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवर ३८१ वसतिगृहे मंजूर असून त्यापैकी ३७७ सुरू असून मुला-मुलींची ( मुलांची २१८ + मुलींची १६३ ) शासकीय वस्तीगृहे कार्यान्वित असून त्यामध्ये ३५५३० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे.

• लाभाचे स्वरूप:
1. मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
2. शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष.
3. क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी.
4. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड , ब्रश कॅनव्हाश इ.
5. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता.


अनु. क्र. शासकीय वसतिगृहाचे नाव अधिक माहिती
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह धाराशिव
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नळदुर्ग
3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह परंडा
4. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने) धाराशिव
5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह लोहारा
6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कळंब
7. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह वाशी
8. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह तुळजापूर
9. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह उमरगा
10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह तुळजापूर
11. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (नविन) धाराशिव

ऑनलाईन योजना