मुख्यमंत्री वयोश्री योजना

• उद्दिष्ट:
राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील सामान्य स्थितीत आवश्यक सहाय्यक साधने / उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच स्वास्थ्य केंद्र, योग उपचार केंद्र इत्यादी द्वारे पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ डीबीटी प्रणालीद्वारे प्रधान करणे.

• योजनेची थोडक्यात माहिती :
राज्यातील 65 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत, पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता / दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने / उपकरणे खरेदी करता येतील. उदाहरण चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल

• अटी व शर्ती
1.विहित नमुन्यातील अर्ज
2.पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
3.आधार कार्ड व मतदान ओळखपत्र छायांकित प्रत
4. राष्ट्रीयकृत बँक पासबुक छायांकित प्रत
5.उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा स्वयंघोषणापत्र
6.शासनाच्या इतर योजनेमधून लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषित पत्र

• लाभाचे स्वरूप
1. राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल.
2. थेट लाभ वितरण डीबीटी प्रणाली द्वारे रु. 3000 च्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल

• अर्ज
अर्ज डाऊनलोड करा

ऑनलाईन योजना