मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

• शासन निर्णय :-
1. शासन निर्णय क्रमांक - ज्येष्ठना-२०२४/प्र.क्र.१८९/सामासु, दिनांक १४ जुलै २०२४

• उद्दिष्ट:
सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळा लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती रु.३०,००० इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल

• अटी व शर्ती
1.लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
2.वय वर्ष साठ व त्यावरील जेष्ठ नागरिक
3.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे

• आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड किंवा राशन कार्ड
2. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला (लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी ज्या लाभार्थ्यांचे पंधरा वर्षांपूर्वीचे. 1. राशन कार्ड 2. मतदान ओळखपत्र 3. शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र 4. जन्माचा दाखला या चार पैकी कोणती ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.)
3. सक्षम प्राधिकरण प्राधिक प्राधिकारी यांनी दिलेलं कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न २.५० लाख पर्यंत असणे अनिवार्य) किंवा पिवळे / केशरी राशन कार्ड
4. वैद्यकीय प्रमाणपत्र
5. पासपोर्ट आकाराचा फोटो
6.जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक
7. सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

• शासन निर्णय डाऊनलोड करा
शासन निर्णय २०२४

ऑनलाईन योजना