भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा सर्वांगीण विकास योजना
• शासन निर्णय :-
1. शासन निर्णय क्र. विघयो-102000/1592/प्र.क्र.189/नवि-4 दिनांक 05 मार्च 2005
2. शासन निर्णय क्र. :- सान्यावि-2015/प्र.क्र.163/बांधकामे कक्ष क्र. 140 दिनांक 09 ऑक्टोंबर 2015
3. शासन निर्णय क्र. दवसु 2016/प्र. क्र.156/अजाक मंत्रालय मुंबई दि. 12 ऑगस्ट 2016
4. शासन निर्णय क्र. :- दवसू 2016/पर.क्र.227/अजाक दिनांक 26 ऑगस्ट 2016
5. शासन निर्णय क्र. :- दवसू 2016/पर.क्र.304/अजाक दिनांक 23 जून 2017
• लाभाचे स्वरूप
सन 2015-16 हे वर्ष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्ष होते व सदरील वर्ष शासनाने “समता व सामाजिक न्याय” वर्ष म्हणून साजरे करायचा निर्णय घेतला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष योजना कार्यान्वित करण्यासाठी सदर योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
• अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींची गावे निवडीचे निकष
1. या योजनेतंर्गत 125 निवडक गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांची निवड करण्यात यावी.
2. यामध्ये अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या मतदार संघातील लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या गावांचा/वस्तीचा समावेश करण्यात यावा.
3. ज्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभुत सोयी-सुविधांचा अभाव आहे अशा वस्त्यांचा प्राधान्याने विचार करावा.
4. सदर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील नागरी सुविधांची कामे शासनाच्या प्रचलित कार्यपध्दती अवलंबून व नियमाप्रमाणे करावीत.
• अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा सर्वांगीण विकास योजनेअंतगर्त घ्यावयाचे विविध उपक्रम
1. पाणीपुरवठा, मलनिसारण, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, गटारे बांधणी, विजपुरवठा, विद्युत पथ दिवे/ सोलर दिवे, सार्वजनिक विहीर खोदाई व दुरुस्ती इत्यादी.
2. समाज मंदिर बांधकाम, जुने समाज मंदिर असेल तर त्यांची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करणे.
3. समाज मंदिरामध्ये वाचनालय, संगणक केंद्र (इंटरनेटसह), व्यवसाय प्रशिक्षण शाळा, व्यायामशाळा (सर्व साहित्यसह) व छोटे सुसज्ज सभागृह असावे.
4. अंगणवाडी, बालवाडी यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
5. स्मशानभूमीत अद्यावत सोयी सुविधा तयार करण्यात याव्यात.
6. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीत प्रत्यक घराला विज कनेक्शन,पाणी, नळ योजनेची जोडणी इ. सुविधांचा आढावा घेऊन करावी.
• शासन निर्णय डाऊनलोड करा
* शासन निर्णय २००५
* शासन निर्णय २०१५
* शासन निर्णय २०१६